स्वाभिमानी युथचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची कोंबडभुजे बौद्ध लेण्यांना भेट…
स्वाभिमानी युथचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची कोंबडभुजे बौद्ध लेण्यांना भेट
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे व रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल जवळील कोंबडभुजे येथील बौद्ध लेण्यांना वाचविण्याकरिता सुमारे पक्षाच्या 400 कार्यकर्त्यांसमवेत भेट दिली.
पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संपादीत जागेत बौद्ध लेणी व केरु माता मंदिर आहे. विमानतळाच्या कामाचा भराव होत असताना ऐतिहासिक लेणी उद्ध्वस्त करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याबरोबर मनोजभाई संसारे यांनी बौद्ध लेणी वाचविण्याकरिता त्वरित लेण्यांच्या जागी आंदोलन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, पनवेल, नवी मुंबई येथील सुमारे 400 कार्यकर्त्यांसमवेत लेण्यांच्या ठिकाणी भेट दिली. या दौर्याला पोलीस यंत्रणेने आक्षेप घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. शेवटी पोलिसांनी मनोजभाई संसारे व महेश साळुंखे यांना बौद्ध लेण्यांची पाहणी करण्याची परवानगी दिली. पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांनी पाहणी करून आंदोलन स्थगित केले. हा दौरा यशस्वी करण्याकरिता मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे, रायगड जिल्हा माजी अध्यक्ष संतोष अडसुळे, पेण शहराध्यक्ष नागेश सुर्वे, पेण तालुकाध्यक्ष अमित कांबळे, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष विजय धोत्रे, पनवेल शहराध्यक्ष प्रकाश जाधव, युवाध्यक्ष सागर जाधव, भाऊ कांबळे व बौद्ध धर्मीय धर्मगुरु मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो ः वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे व रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल जवळील कोंबडभुजे येथील बौद्ध लेण्यांना वाचविण्याकरिता दिलेली भेट