स्वच्छता अभियान चे सर्वेक्षण जी मंडळी करतात ती मंडळी कुठली गोष्ट बघून एखाद्या महापालिकेला नंबर देतात ?

नमस्कार आपल्याला सर्वांना माहित आहेच कि पनवेल महापालिकेचा स्वच्छता अभियानामध्ये देशात २० वा तर राज्यात ५ वा क्रमांक आला होता पण प्रशासनाला एक गोष्ट मला आवर्जून विचारायची आहे कि स्वच्छता अभियान चे सर्वेक्षण जी मंडळी करतात ती मंडळी कुठली गोष्ट बघून एखाद्या महापालिकेला नंबर देतात पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रत्येक जागी म्हणजेच ते मग कोळीवाडा उरण नाका असुद्या , ग्रामीण रुग्णालय , छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कॉम्प्लेक्स , महापालिकेच्या शाळा , पनवेल बस डेपो , किनारा सोसायटी परिसर , त्याचसोबत नवीन पनवेल मधील शिवा कॉम्प्लेक्स जवळील सिडको चा बंद असलेला बस स्टॉप बाजूचे मच्छी मार्केट या सर्व जागी स्वतः एकदा तरी आयुक्त साहेबांनी जाऊन पाहणी करावी हि मी या पत्राद्वारे आपणांस विनंती करत आहे ठेकेदार प्रशासनाचे ऐकत नसेल तर ताबडतोब त्याचे काम बंद करण्यात यावे तिकडे दुसऱ्या कंपनी ला काम द्यावे अन्यथा आमची संपूर्ण टीम आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहीम प्रामाणिकपणे नक्कीच करू त्याचप्रमाणे ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे त्या ठेकेदाराला प्रशासन विचारू शकत नाही का कि काम का होत नाही ??ठेकेदाराला त्यांची बिले वेळेवर मिळतात ह्यामधील प्रत्येक ठेकेदार हा किमान वेतन या प्रमाणे कामगाराला पगार देतो का , त्यांचा प्रत्येकाचा PF भरतो का ? हजेरी रजिस्टर महापालिका प्रशासन अधिकारी चेक करतात का ? कामगार किती असतात हे सुद्धा चेक करन्यात यावे या सर्वांची खात्री करूनच त्यांची पुढची बिले काढावीत त्याचसोबत सत्ताधारी पक्ष महापालिका प्रशासनाला सांगून ठेकेदाराला पाठीशी नाही ना घालत ह्या गोष्टींची पण खात्री करावी पनवेल मध्ये मंत्री महोदय साहेब येणार असतील तर मग तेवढाच परिसर स्वच्छ केला जातो किंवा त्यांना थोड्या अवंशी चांगल्या रस्त्यांनी आणले जाते तर मग रोज पनवेल मध्ये कोणीतरी येणार असं समजून जर पूर्ण पनवेल महापालिका क्षेत्र स्वच्छ ठेवलं तर ती गोष्ट आपल्या सर्वांसाठी खूप आनंददायी असेल आणि लवकरात लवकर खरंच स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल हि खरी ओळख नावारूपाला येईल .
टीप :- दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी दिलेले पत्र आणि आज दिनांक १ सप्टेंबर २०२० रोजी दिलेले पत्र यांदोन्ही पत्रांच्या विषयांवर आपण नक्की काय केले हे सुद्धा आम्हाला सांगा हि विनंती या बाबतचे निवेदन मी आज लेखी पत्राद्वारे दिले ..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *