गणेश मंडळांना कळंबोली पोलिसांकडून प्रशस्तीपत्रक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याच्या निर्णयाचे कौतुक..

गणेश मंडळांना कळंबोली पोलिसांकडून प्रशस्तीपत्रक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याच्या निर्णयाचे कौतुक
वरिष्ठ पोलीस निरिक्षक सतीश गायकवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद
पनवेल/प्रतिनिधी:-कोरोना विषाणुचे संक्रमण होवू नये याकरीता यावर्षी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय कळंबोलीतील गणेश मंडळांनी घेतला .त्यामुळे कोरोना नियंत्रण ठेवण्यास यश मिळाले. या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी आवाहन केले होते. त्याला गणेशोत्सव मंडळांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या पार्श्वभूमीवर सोमवारी संबंधितांना पोलिसांनी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. कोरोना संकटा विरोधात लढण्यासाठी सहयोग दिल्याबद्दल मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.

कळंबोली वसाहतीत बिमा कॉम्प्लेक्स, राजे शिवाजी नगर रहिवासी मंडळ, कळंबोली युथ क्लब, ओमकार मित्र मंडळ, एकता सामाजिक सेवा संस्थेचा रोडपाली चा राजा, स्टील चेंबर असोसिएशन, ओमकार मित्र मंडळ यासारखे एकूण बारा मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. देखाव्यासाठी कळंबोलीतील गणपती प्रसिद्ध आहेत. विशेष करून बिमा कॉम्प्लेक्स आणि राजेश शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळासमोर जिवंत देखावे साकारण्यात येतात. केवळ पनवेलच नव्हे तर नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातून ते पाहण्यासाठी भक्त येतात. पश्चिम महाराष्ट्र सुद्धा कित्येक जण गणपती पाहण्यासाठी कळंबोलीत येत असतात. एकंदरीतच वसाहतीतील गणेशोत्सव मनपा क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय मानला जातो. विद्युत रोषणाई, भव्य दिव्य आणि मनमोहक श्रींच्या मूर्ती विविध सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण दहा दिवस व्यस्त असतात. याशिवाय नेत्रदीपक अशा विसर्जन मिरवणुका सुद्धा कळंबोलीत काढल्या जातात. दरम्यान यावर्षी कोरोना वैश्विक संकट असल्याने राज्य शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले होते. विशेष करून पोलीस आयुक्त संजय कुमार, उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या सूचनेनुसार कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी मंडप आणि गर्दी विरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले होते. त्यानुसार महत्त्वाच्या मुख्य मंडळांनी यावर्षी गणेशोत्सव साजरा केला नाही. काहींनी खंड पडू नये म्हणून बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती. याठिकाणी कोणतीही गर्दी होऊ दिली नाही. परिणाम यानिमित्ताने कोरोना विषाणूंचे संक्रमण झाले नाही. यामुळे कळंबोली करांचे आरोग्य अबाधित राहिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिल्याने ही गोष्ट साध्य झाली. या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलिसांकडून या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निमंत्रित करून त्यांचे सामंजस्य ,सामाजिक बांधिलकी, लोकहिताबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याच्या भावनेचे कौतुक केले. संबंधितांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

कोट
पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक आयोजित केलेली होती. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही गणेश मंडळांना या वर्षी कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने गणेशोत्सव साजरा करू नये असे आवाहन केले होते.
आमच्या विनंतीला मान देऊन कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 12 सार्वजनिक व 13 सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी सन 2020 चा गणेशोत्सव साजरा केला नाही.
या मंडळांना प्रोत्साहन व त्यांचे कौतुक म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे यापुढे ही कोरोना ला हरवण्यासाठी मंडळांनी पोलिसांसह शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले.
सतिश गायकवाड
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळंबोली पोलीस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *