स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची पनवेल परिसरात भेट..
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची पनवेल परिसरात भेट
पनवेल, दि.31 (वार्ताहर) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांनी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ कांबळे यांच्या वडीलांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या जलदान विधीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून कुटुंबियांचे सांत्वन केले.
त्यानंतर आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या घरी जावून त्यांच्या आजारपणाबद्दल विचारपूस केली. या पनवेल दौर्याप्रसंगी त्यांच्या समवेत रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, रायगड जिल्हा माजी अध्यक्ष संतोष अडसुळे, पेण शहराध्यक्ष नागेश सुर्वे, पेण तालुकाध्यक्ष अमित कांबळे, वावंजे विभाग अध्यक्ष आकाश जाधव, बबलू कांबळे, समीर धायगुडे व पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांनी दिलेली सांत्वनपर भेट.