पनवेल: खारघरमध्ये आज आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळला
पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता २१ वर पोहोचली आहे. खारघरमधील कोरोनाबाधितांची संख्या ४ वर पोहोचली असून महापालिका हद्दीत एकूण १७ तर उलवे नोडमध्ये ४ कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे.

पनवेल तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या २१ वर पोहोचली आहे. कामोठे २, खारघर ४ तसेच सीआयएसएफचे ११ जवान आणि उलवे नोडमध्ये ४ , असे एकूण आतापर्यंत कोरोनाच्या २१ रूग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, कामोठ्यातील २, खारघरमधील १ आणि सीआयएसएफचा १ जवान असे एकूण कोरोनाचे ४ रूग्ण पुर्णपणे बरे झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तसेच आज दिनांक ९/४/२०२० रोजी बनवेल मधील नवीन रुग्ण हा वय वर्ष ३३ असून खरघरचा रहिवाशी आहे, हा कोरोनाग्रस्त रुग्ण नवी मुबंई मनपा च्या वाशी रुग्णालयात ऍडमिट केले असून वाशी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू आहेत..