भारतीय जनता पार्टी,कोपरखैरणे तालुका तर्फे घंटानाद आंदोलन.

भारतीय जनता पार्टी,कोपरखैरणे तालुका तर्फे घंटानाद आंदोलन.

प्रतिनिधी -उरण दि 29(विठ्ठल ममताबादे )
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरिओम चा नारा देत राज्यात दारूची दुकाने व इतर आस्थापने चालू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु पुनश्च हरिओम चा नारा देत चालू केलेल्या “मिशन बिगिन” मध्ये मंदिर मात्र बंद च राहतील असा मुघली फर्मान स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित ठाकरे सरकारने काढला. या मुघली फर्मान विरोधात महाराष्ट्र भरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मंदिरां बाहेर आज घंटानाद आंदोलन केले जात आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाच्या आदेशानुसार आज २९ ऑगस्ट रोजी भाजपा कोपरखैरणे तालुक्याच्या वतीने कोपरखैरणे येथील श्री साई बाबा मंदिराच्या बाहेर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री.अंकुश(बाबा) कदम यांनी “ठाकरे सरकारच्या राज्यात मदिरालय सुरु आहे पण देवालय नाही” ही संतापजनक बाब असल्याचे मत व्यक्त करत “लवकरात लवकर राज्यातील मंदिर उघडली नाहीत तर आंदोलन तीव्र करण्यात येईल” असा इशारा दिला.
सदर वेळी भाजपा कोपरखैरणे तालुका सरचिटणीस मयूर धुमाळ, भाजयुमो तालुका अध्यक्ष विजय धनावडे,ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत जाधव,समाजसेवक रवींद्र वाळुंज,वॉर्ड अध्यक्ष रघुनाथ नारायणकर, तुषार सुळके,उमेश जगताप व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *