*ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपाचे “दार उघड उद्धवा दार उघड” घंटानाद आंदोलन*

ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपाचे “दार उघड उद्धवा दार उघड” घंटानाद आंदोलन राज्यातील मंदिरे सुरु करा या मागणी करीता महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संघटना , धर्मचार्य आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन कुंभकर्णापेक्षाही गाढ झोपलेल्या ठाकरे सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी आज दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी स. ११ वाजता राज्यभरात आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे आंदोलन करण्यात आले.याचाच एक भाग म्हणून पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र१८ मधील शिवमंदिरात भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र व स्थानिक नगरसेवक श्री.विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी मा.कोकण म्हाडा सभापती श्री. बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते. तसेच प्रमुख कार्यकर्ते सौ.वसुधा सोलंकी,सौ.संजीवनी खिलारे,सौ.स्वाती पवार,सौ.प्रिया भोसले,विक्रम ठाकुर,उदय पाटील,प्रशांत पाटील,निलेश वाडेकर,सचिन कुलकर्णी,प्रदीप कांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *