पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आशा सेविकांनी मानले आभार …

दिनांक ७/४/२०२० रोजी कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आशा सेविकांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले .त्यासाठी युनिट १ व युनिट २ च्या आशा सेविकांना त्यांच्या या नावाप्रमाणेच आरोग्याशी निगडित आहेत. कोणाच्याही आरोग्यासाठी त्यात जन्मतःच मुले असो गर्भवती महिला असो व अन्य कोणताही आजाराचे लसिकरण असो अशांची काळजी चांगल्याप्रमाणे घेत असतात त्यासाठी त्यांना प्रत्येक घरी जाऊन कुटुंबाची चौकशी त्यांचा आरोग्याची काळजी घेत असत. त्यांना केंद्रात जाऊन औषध तपासून घ्या सांगून मदत करत असतात. अशातच कोरोनानी हद्द केली त्यासाठी त्यांना अधीक काम करावे लागत आहे.स्वतःच्या जीवाची काळजी न करता कुटुंबाची काळजी न करता त्या दुसऱ्याची काळजी करत आहेत.

सर्वेला जाताना नोजमास्क,हातात ग्लोज,सनेटायझर बरोबर घेऊनच असतात कारण त्यांना स्वतःच्या कुटुंबाची देखील काळजी आहे.त्यासाठी आयुक्त गणेश देशमुख साहेब सर्वतोपरी त्यांना मदत करत आहेत. तसेच सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टर,सिस्टर देखील मदत करत असतात. तरी देखील एक सामजिक बांधीलकी म्हणून कमळ महिला नागरी सहकारी पतसंस्था पनवेल यांनी त्यांच्या सर्व टीमने आशा सेविकां यांना सॅनिटाइझरची ५० ग्रॅम ची बॉटल प्रत्येकी १ या प्रमाणे दिली आहे अशा १०० बॉटल त्यांनी दिल्या आहेत यावेळी संस्थेचे संस्थापक श्री शशिकांत बांदोडकर साहेब सर्व कर्मचारी उपस्थित होते. सर्व आशा सेविकांनी त्यांचे मनापासून आभार मानले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *