कौटुंबिक न्यायालय समुपदेशक संघटनेच्या ‘प्रतिबिंब २०२०’ अंकाचे प्रकाशन संपन्न…

कौटुंबिक न्यायालय समुपदेशक संघटनेच्या
‘प्रतिबिंब २०२०’ अंकाचे प्रकाशन संपन्न

महाराष्ट्र राज्य कौटुंबिक न्यायालय समुपदेशक संघटने तर्फे दर वर्षी ‘प्रतिबिंब’ हा अंक प्रकाशित केला जातो. या अंकात कौटुंबिक आणि वैवाहिक नाते संबंध आणि समुपदेशन या विषयावर मा. न्यायाधीश, समुपदेशक आणि मानसशास्त्रीय व कायदे तज्ञ यांचे वैचारिक, अनुभवज्यन्य आणि संशोधनात्मक लिखाण प्रसिद्ध करण्यात येते.

अंकाचे प्रकाशन दि. २५ ऑगस्ट २०२० रोजी मा. न्यायमूर्ती श्रीम. विभा कंकणवाडी, पालक न्यायमूर्ती कौटुंबिक न्यायालये औरंगाबाद खंडपीठ यांच्या शुभ हस्ते उच्च न्यायालय औरंगाबाद येथे संपन्न झाले. या प्रसंगी मा. प्रमुख न्यायाधीश औरंगाबाद कौटुंबिक न्यायालय श्रीम. स्मिता सावसकर, अंकाच्या संपादिका श्रीम. रश्मी देशपांडे, विवाह समुपदेशक श्रीम. ज्योती सपकाळे आणि श्री. भरत काळे हे उपस्थित होते. या वेळी बोलताना मा. न्यायमूर्ती श्रीम. विभा कंकणवाडी यांनी अंकास शुभेच्या व्यक्त केल्या.

या वर्षीच्या अंकातील उत्कृष्ट लिखाण करणाऱ्या समुपदेशकांची नावे मा. न्यायाधीश श्रीम. स्मिता सावसकर यांनी जाहीर केली. प्रथम क्रमांक ‘बेडी लग्नाची’ या लेखास श्रीम. स्मिता जोशी पुणे, द्वितीय क्रमांक विभागून श्री. जगन्नाथ कांबळे बुलढाणा, यांच्या ‘आंतरक्रिया विश्लेषण उपचार पद्धती’ या लेखास आणि श्रीम. वीणा आठवले पुणे यांच्या ‘नात-एक समुपादेशीय दृष्टीकोन’ या लेखास, तृतीय क्रमाक निलोफर लोखंडवाला मुंबई यांच्या ‘एकत्रित रहाताना विश्वास मूल्याचे महत्व’ या लेखास तर उत्तेजनार्थ श्री. भरत काळे औरंगाबाद यांच्या ‘भारतीय कुटुंब व्यवस्थेत समान तत्वावर मुलांच्या ताब्याची संकल्पना’ या लेखास जाहीर करण्यात आला.

प्रतिबिंब अंकाचे वितरण महाराष्ट्रातील कौटुंबिक न्यायालये, न्यायाधीश, समुपदेशक वकील संघ, मानसोपचार तज्ञ आणि समाजकार्ये महाविध्यालयातून केले जाते. यातील लिखाण पक्षकार, वकील आणि कौटुंबिक समुपदेशन क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वाना मार्गदर्शक ठरते.

करोना संसर्ग प्रतिबंधात्मक पार्शवभूमीवर सदर अंकाचे प्रकाशन प्रातिनिधिक स्वरूपात व्यक्तिगत अंतर राखून योग्य त्या दक्षता घेऊन केवळ पाच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. असे संघटनेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ कांबळे यांनी प्रतिपादन केले आह..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *