आमचे आम्हीच या मित्रमंडळाने अनेक घरच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले

कोरोना काळात गणेश विसर्जनासंबंधीचे कडक नियम असताना पनवेलमध्ये घरी जाऊन बाप्पा व्यवस्थित विसर्जित करण्याचा कार्यक्रम माजी शिवसेना नगरसेवक श्री. प्रथमेश चंद्रशेखर सोमण आणि आमच्या ‘आमचे आम्हीच ‘या मित्रमंडळाने प्रामाणिकपणे पार पाडला साधारण ७०० हुन अधिक लोकांनी आम्हाला फोन केले त्यापैकी साधारण १७५ ते २०० लोकांनी आम्हाला त्यांचे गणपती विसर्जनासाठी दिले आणि जेव्हा गणपती आम्हाला लोकं द्यायचे तेव्हाच लगेच आम्ही पाटावर माती सुद्धा द्यायचो त्याचप्रमाणे करोना ची अतिशय गंभीर समस्या असताना होणारी गर्दी आम्ही कमी केली. प्रसंगी सर्व गणपती आम्ही व्यवस्थित पद्धतीने विसर्जन केले प्रत्येकानी हँगग्लोज , मास्क सॅनिटायझर या सर्व गोष्टींची काळजी सुद्धा घेतली होती.. 🙏🙏🙏 हा उपक्रम यशश्वी करण्यासाठी प्रसाद सोनावणे ,मंदार प्रमोद काणे , अथर्व गोखले , अभिनय सोमण , केदार कोशे , श्रीरंग केतकर , कौस्तुभ सोमण , अभिषेक पटवर्धन , आर्केश कुलकर्णी , अक्षय जोशी , संदीप दादा ,स्वप्नील सहस्रबुद्धे , स्वप्नील उपाध्ये ,अर्जुन परदेशी या मंडळींनी विशेष परिश्रम घेतले .. 🚩 || गणपती बाप्पा मोरया || 🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *