पनवेलकरांच्या सेवेसाठी जान्वी टेलिकॉम हे नवीन मोबाईलचे दालन सुरू..

पनवेलकरांच्या सेवेसाठी जान्वी टेलिकॉम हे नवीन मोबाईलचे दालन सुरू झाले- आ. प्रशांत ठाकूरपनवेल दि.20 (वार्ताहर)-पनवेलकरांच्या सेवेसाठी जान्वी टेलिकॉम हे नवीन मोबाईलचे दालन सुरू झाले असून याठिकाणी विविध नामांकीत कंपन्यांचे मोबाईल तसेच इतर साहित्य उपलब्ध होणार असल्याने एकाच ठिकाणी सर्व काही खरेदी करण्याचा आनंद खऱ्या अर्थाने मिळणार असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उद्घाटनप्रसंगी केले आहे.          दिपक साडीचा नवीन उपक्रम म्हणून पनवेल शहरातील अलाहाबाद बॅंकेसमोर यशेबालकृष्णा, शॉप नं-11, मिडलक्लास सोसायटी, प्लॉट नं.-47 येथेजान्वी टेलिकॉम हा उपक्रम सोनी बंधुंनी सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन पनवेलचेआमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पवन सोनी यांच्यासह व्यापारी बांधव व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. सोशल डिस्टंसिंग पाळून यावेळी उद्घाटन करण्यात आले.          फोटोःआमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्तेजान्वी टेलिकॉम या नवीन मोबाईल दालनाचे उद्घाटन झाले यावेळीपनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पवन सोनी यांच्यासह व्यापारी बांधव व समाज बांधव यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *