रोटरी फाउंडेशन पनवेल तर्फे वायू प्रज्वलित शवदाहीनी पुन्हा बंद अवस्थेत.. उदघाटनाचा घाट घातलाच कशाला?

रोटरी फाउंडेशन पनवेल तर्फे वायू प्रज्वलित शवदाहीनी पुन्हा बंद अवस्थेत.. उदघाटनाचा घाट घातलाच कशाला? वारंवार थकबाकी मुळे शवदाहिनी बंद करण्यात येते या मागचे नेमके गौडबंगाल काय?

पनवेल वार्ता प्रतिनिधी : शुभांगी पवार.
रोटरी फाउंडेशन पनवेल तर्फे वायू प्रज्वलित शवदाहीनी जी 2019 मध्ये कित्येक महिन्यांपासून बंद अवस्थेत होती ती दिनांक 13/01/2020 पासून सुरू करण्यात आली होती . शवदाहीनी चा खर्च रु .2500 प्रती शव आकारन्यात येत असून आज हे काम काही जुने भरणा न दिल्याकारणाने पुन्हा बंद करण्यात आले आहे. कोरोना संकट काळात अन्य काही इतर आजारांमुळे ही लोकं मृत्यूमुखी पडत आहे, त्यांचे शव याच ठिकाणी आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून वायू प्रज्वलित शवदाहीनीमार्फत दहन करण्यात येत होते परंतु आता शवदाहिनी पुन्हा बंद करण्यात आल्यामुळे पनवेलमधील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या थाटामाटात अधिकाऱ्यांकडून या वायू प्रज्वलित शवदाहीनीचे उदघाटन करण्यात आले होते परंतु वारंवार थकबाकी मुळे ही शवदाहिनी बंद करण्यात येते या मागचे गौडबंगाल काय आहे? या शवदाहिनी कडे गांभीर्याने का लक्ष देता येत नाही? असे अनेक प्रश्न आता स्थानिक नागरिकांना पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *