वरसोली ग्रामपंचायत तर्फे निसर्ग चक्रीवादळातील महावितरण वीज योद्धांचे सन्मान

वरसोली ग्रामपंचायत तर्फे निसर्ग चक्रीवादळातील महावितरण वीज योद्धांचे सन्मान
भांडूप, दि. १९/८/२०२०:

निसर्ग चक्रीवादळत रायगड जिल्हात महावितरण वीज यंत्रणेचे अतोनात नुसकान झाले होते.रायगड जिल्हातील अलिबाग, मुरुड, तळा, म्हसळा, गोरेगाव, पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, रोहा, तालूक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. यामध्ये अलिबाग विभाग विभागातील वरसोली शाखे अंतर्गत महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून वीजपुरवठा पर्ववत केला. त्यांच्या या कामगिरी बद्दल स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात वरसोली ग्रामपंचायततर्फे सन्मान चिन्ह देवून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
निसर्ग चक्रीवादळात वरसोली शाखे अंतर्गत येणाऱ्या रामनाथ नाईक आळी, ताडआळी, कोळीवाडा, बुरूमखाण, विठ्ठल मंदिर, शिवनगर, बामनोळी, भुते, मुळे गावातील ३४ लघुदाब खांब व विद्युत वाहिनीचे भरपूर नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी विद्युत तारांवर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच ३४ लघुदाब खांब कोसळले होते. याशिवाय, उच्चदाब खांबावरील व्ही-क्रॉस आर्म वाकून गेले होते. महावितरण अलिबाग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. माणिकलाल तपासे याच्या मार्गदर्शनाखाली वरसोली शाखेचे सहाय्यक अभियंता श्री. निखिलेश शेंडे सोबत विद्युत कर्मचारी, तसेच विद्युत ठेकेदाराचे कामगार, ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने लाईनवर तुटून पडलेली झाडे बाजूला केली व पडलेले ३४ लघुदाब खांब पुन्हा उभे केले तसेच वाकलेले उच्चदाब खांब सरळ करून येथील काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. महावितरणच्या या उत्तम कामगिरीबद्दल वरसोली ग्रामपंचायतीमार्फत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच त्यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.
महावितरणच्या मुख्य अभियंता सौ. पुष्पा चव्हाण यांनी सुद्धा चक्रीवादळात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबाबत वरसोली शाखेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
ममता पाण्डेय जनसंपर्क अधिकारी भांडूप नागरी परिमंडळ भांडूप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *