राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सालाबादप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, खांदा कॉलनी,पनवेल येथे राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण आयोजित करण्यात आले होते. गेले १८ वर्ष सातत्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येत आहे.
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा दृष्टी फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री.किशोर देवधेकर सर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत,
ध्वजगीत व संविधानाच्या उद्देशिकेचे समूह वाचन करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमात पावसाने हजेरी लावली.
सदर प्रसंगी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सचिव श्री.गणेश पाटील,जिल्हा सचिव सुहास बनसोडे,जिल्हा सचिव श्री. गोविंद मोरे,श्री . सोनावणे, सौ.नम्रता देवधेकर, सारण्यामाई ,दृष्टीताई आदी प्रमुख उपस्थित होते.