लॉकडाउन काळात व्यापाऱ्यांच्या पाठीशी शिवसेना….

देशभरात २३ मार्च पासून लागू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक तुटवड्यास सामोरे जावे लागले आहे. ह्या विषयाला अनुसरून पनवेलमधील व्यापाऱ्यांनी रायगड जिल्हा सल्लागार श्री. बबनदादा पाटील ह्यांच्याकडे इतर महानगरपालिकांप्रमाणेच सम-विषम धोरण रद्द करण्यात यावे अशा मागणीचे पत्र दिले होते. त्यानुसार श्री. बबनदादा पाटील ह्यांनी तातडीने सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे ह्या व्यापाऱ्यांची अडचण पोहचवली व व्यापारी संघटनेस ह्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची मागणी केली होती.

व्यापार्यांच्या अडचणीसंदर्भातील ह्याच मुद्द्यावर आज श्री. बबनदादा पाटिल ह्यांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. राजूभाई सचदेव, तसेच पदाधिकारी
श्री. मनोजभाई देडिया,
श्री. सचिनजी बहाडकर आणि श्री. अतुलजी पलन ह्यांच्यासह आयुक्त श्री. सुधाकर देशमुख ह्यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *