ओव्हर ब्रीजखाली आढळला मृतदेह..

पनवेल दि.10 (वार्ताहर): पनवेल एसटी स्टॅंडसमोरील ओव्हर ब्रीजखाली एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलिस करीत आहेत.
           सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असून ती अंगाने सडपातळ, रंग काळासावळा, उंची चार फूट पाच इंच असून, चेहरा उभट, मिशी तलवार कट, केस काळे आहेत. अंगात पांढरी काळी आडवे पट्टा असलेला हाफ बाह्यांचा टीशर्ट व काळ्या रंगाची ट्रॅक पॅंट, त्यावर गुलाबी रंगाची पट्टी आहे.  या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे – 02227452333 किंवा सहा. पोलिस निरीक्षक अमोल कोरडे यांच्याशी संपर्क साधावा.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *