शिवसेनेच्या प्रयत्नाने सिडकोने केलेल्या इ.एम.आय. वरील सक्तीची व्याज वसुली व त्यावरील निलंब शुल्क करण्यात आले माफ

पनवेल दि.10 (वार्ताहर): शिवसेनेच्या प्रयत्नाने सिडकोने केलेल्या इएमआयवरील सक्तीची व्याज वसुली व त्यावरील निलंब शुल्क माफ करण्यात आले असून यासाठी शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता.        

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडकोमधील हजारो घर खरेदीदार हवालदील झाले आहेत. व मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच सिडकोने इएमआयवरील सक्तीची व्याज वसुली व त्यावरील निलंब शुल्क आकारण्यात सुरवात केल्याने हा वर्ग मोठ्या अडचणीत सापडला होता. यासंदर्भात अड. अमर पटवर्धन यांनी जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडून सर्वसामान्यांना मदत करण्याची व त्यांना दिलासा देण्याची विनंती केली. या संदर्भात त्वरीत शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडे मागणी व पाठपुरावा केला होता. या मागण्यांची दखल घेत सिडकोनेइएमआयवरील सक्तीची व्याज वसुली व त्यावरील निलंब शुल्क माफ केल्याची माहिती त्यांना दिली आहे. त्यामुळे हजारो घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *