महेश साळुंखे यांचा सामाजिक बांधिलकीद्वारे वाढदिवस साजरा
पनवेल (वार्ताहर): स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांचा आज पनवेलसह जिल्ह्यात विविध सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.
पनवेल तहसिल कार्यालयातील सेतूमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना महेश साळुंखे यांनी मोफत मास्कचे वाटप केले. तसेच रा. जि. प.च्या वडघर येथील प्राथमिक शाळेतील गोरगरिब विद्यार्थ्यांना व परिसरातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्ह्याभर वृक्षरोपण मास्कवाटप, रक्तदान आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज संसारे, आ. प्रशांत ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. बाळाराम पाटील, मा.आ. विवेक पाटील, मुंबई बाजार समितीचे राजेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काशिराम पाटील आदींसह विविध पक्षांच्या मान्यवर नेतेमंडळींनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.