जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र. राष्ट्रवादीच्या रोडपाली शहराध्यक्षपदी शरद गायकवाड यांची निवड.


पनवेल /प्रतिनिधी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रोडपाली शहराध्यक्षपदी शरद साहेबराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील यांच्या हस्ते कळंबोली येथे गायकवाड यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

शरद गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना ते आदर्श मानतात. सामाजिक बांधिलकी ठेवून गेल्या काही वर्षांपासून ते काम करीत आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांनी गायकवाड यांची रोडपाली शहराध्यक्षपदी वर्णी लावली आहे.

आपण अगदी निष्ठेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न कराल त्याचबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या विचारांवर मार्गक्रमण करून कार्य कराल याबाबत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीला आशा असल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. रोडपाली शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल शरद गायकवाड यांचे सतीश पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले आहेत. पक्ष आणि जिल्हाध्यक्षांनी दिलेली जबाबदारी समर्थपणे पेलवून त्यांचा विश्वास नक्कीच सार्थकी लावील . त्याचबरोबर पक्ष वाढीबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचा प्रमाणिक प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी निवडीनंतर दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *