पनवेल विधानसभा समन्वयक जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी दिले नियुक्तीपत्र

पनवेल/ प्रतिनिधी:- प्रदीप ठाकूर यांची शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ठाकूर यांच्या रूपाने युवा नेतृत्व पक्षाने पुढे आणले आहे. या निवडीचा पनवेल विधानसभा क्षेत्रात पक्षवाढीसाठी नक्कीच फायदा होईल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेल्या प्रदीप ठाकूर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. चांगला जनसंपर्क असलेल्या ठाकूर यांच्याकडे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कोकण संपर्कनेते सुभाष देसाई आणि रायगड संपर्क प्रमुख दत्ता दळवी यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांसाठी ही नियुक्ती असणार आहे. पनवेल विधानसभा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढवण्याची मोठी संधी प्रदीप ठाकूर यांच्याकडे आलेली आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या निवडीबद्दल जिल्हाप्रमुख शिरिष घरत, महानगरप्रमुख रामदास शेवाळे याने प्रदीप ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *