पनवेलसाठी चांगली बातमी – आयुक्तांच्या आवाहनानुसार मेट्रोपोलीस लॅब करणार 4.5 कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत

पनवेल दि. 28 मे 2020

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या प्रयत्नाने आज पनवेल महानगरपालिकेस 4.5 कोटींच्या कोरोना चाचण्या मोफत करण्याची मेट्रोपोलीस लॅबने मान्य केली.

मेट्रोपोलीस या कोरोना चाचणी करणाऱ्या ICMR मान्यताप्राप्त खाजगी प्रयोगशाळेला नुकताच पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यास या प्रयोगशाळेने अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेल शहरामध्ये पुढील ३ महिन्यात एकूण १०,००० चाचण्या सीएसआर माध्यमातून मोफत करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. यानुसार आज संबंधित प्रयोगशाळेचे प्रतिनिधी डॉ. प्रदीप महिंद्रकर व श्री महाजन यांच्यासोबत महानगरपालिका आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांनी विचारविनिमय करून नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.

या चाचणीसाठी आज रोजी प्रत्येकी रुपये ४,५०० का खर्च येतो. या प्रस्तावामुळे महानगरपालिकेस अंदाजे रुपये ४ कोटी ५० लाख इतक्या रकमेचा फायदा होणार आहे. महानगरपालिकेच्या निधीतून हा खर्च केला असता तर तेवढा भार मनपाच्या तिजोरीवर पडणार होता.

आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या दमदार सुरुवातीची ही झलक आहे. पनवेल लवकरच कोरोना मुक्त करण्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेस नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन देखील आयुक्तांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *