श्री साई नारायण बाबा संस्थानतर्फे गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल दि.28 (वार्ताहर)- गेल्या दोन महिन्यांपासून पनवेल शहरातील श्री साई नारायण बाबा संस्थानतर्फे गरजवंतांना मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. आजही पनवेल परिसरातील शेकडो नागरिकांना श्री साई नारायण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


श्री साई नारायण बाबा संस्थेचे रामलाल चौधरी, राम थदानी व इतर साई सेवकांनी पनवेल परिसरातील गरजवंतांना मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यापूर्वीही त्यांनी निराधरा व विधवा महिलांना महिन्याचे रेशन सामान भरून दिले. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी खिचडी वाटप, पंतप्रधान तसेच मुख्यमंत्री सहायता निधीला संस्थेमार्फत मदत, पोलिस बांधवांना फेस मास्क, सॅनिटायझर, पाण्याचे वाटप, गरजूंना अन्नदान असे उपक्रम दररोज राबविले जात असून मुख्य म्हणजे हे सर्व उपक्रम सोशल डिस्टंसिंगद्वारे पार पाडण्यात येत आहे. सध्याच्या काळात कोणालाही मदत हवी असल्यास त्यांनी संस्थेकडे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने राम थदानी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *