स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे 28 हजार नागरिकांची जेवणाची व्यवस्था

पनवेल दि.28 (वार्ताहर)- पनवेलमधील 52 बंगला या विभागात असलेल्या स्वामी नारायण ध्यान केंद्राद्वारे पनवेल परिसरातील जवळपास 28 हजार नागरिकांची गेल्या 42 दिवसांमध्ये जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोना वायरस मुळे पनवेलमध्ये आणि राज्य तसेच देश भर लॉकडाऊन आहे, त्या लॉकडाऊन मुळे मजूर, गरीब, तसेच ज्यांचा हाथा वर पोट आहे अश्या लोकांची दुर्दशा झाली आहे. अश्या लोकांनी खावे तरी काय अशी परिस्थिती होती, त्या अनुषंगाने विचार करून व देवाज्ञा ने आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ” स्वामीनारायण ध्यान केंद्र पनवेल” ने अश्या गरजू लोकांना जेवण मिळावे. या साठी दिनांक २८/३/२०२० पासून तैयार फूड पॅकेट देण्याचे ठरवले होते. सुरवातीला ३०० लोकांसाठी चालू केले ते हळू हळू ९५० फूड पॅकेट च वितरण रोज केले जात आहे आणि जोपर्यंत लॉकडाऊन आहे तोपर्यंत अशा गरजू लोकांना संस्थेमार्फत फूड पॅकेट्स वितरण करण्यात येणार. सुरवातीला हे वितरण पोलिसां मार्फत नंतर महानगरपालिका मार्फत करण्यात येत आहे. ह्यात मुख्यत्वे कळंबोली, रोडपाली, मार्बल मार्केट, निवारा केंद्र, करंजाडे, डोंबाळा येथील गरजू लोकांना देण्यात येत आहे , या कार्याकरिता संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे सोशल डिस्टन्स सिंग तसेच सरकारची जी नियमावली आहे त्या अंतर्गत काम करीत आहे. आत्तापर्यंत 28 हजार लोकांना याचे वाटप करण्यात आले. ह्या सेवेच्या कार्य करिता महानगरपालिका पनवेल व पनवेल पोलिस स्टेशनचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *