पनवेल ज्रेष्ठ नागरिक संघाचा 21 वा वर्धापनदिन भव्यदिव्य स्वरूपात दिमाखात साजरा.
पनवेल ज्रेष्ठ नागरिक संघाचा 21 वा वर्धापनदिन भव्यदिव्य स्वरूपात दिमाखात साजरा
पनवेल दि.२५(वार्ताहर) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिकी संघाचा २१ वा वर्धापन दिन उद्योजक जे.एम.म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उस्ताहास साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून नागरिक संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आली.
यामध्ये जयंत गुर्जर, सुनिल खेडेकर, माधुरी गोसावी, बाळकृष्ण खेडेकर, माणिक, चव्हाण आणि इतर दहा पंधरा जणांची नवीन कार्रकारिणी निवडून आली आणि संघात अमुलाग्र बदलाला सुरवात झाली. या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी 128 वर्षे कार्यरत असणाऱ्या पुण्याच्या भरत नाट्य मंदिर या संस्थेचे स्वर सम्राज्ञी हे संगीत नाटक आयोजित करण्यात आले होते. तर दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक जे.एम.म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सर्व सभासदांना ड्रेस कोड देण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रमुख पाहुणे प्रदीप वेलणकर यांनी श्रोत्रांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला अध्यक्ष जरवंत गुर्जर, सचिव सुनिल खेडेकर, सभासद श्री. जोशी, यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि मान्यवर उपस्थित होते.