बाळासाहेबांच्या शिवसेने तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार.

बाळासाहेबांच्या शिवसेने तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार
पनवेल दि.२५(वार्ताहर): बाळासाहेबांची शिवसेना पनवेल यांच्यातर्फे उल्लेनिय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांच्या पनवेल कुंभारवाडा येथील मंदिरामध्ये संपन्न झाला. हा कार्यक्रम विभागप्रमुख ऍडव्होकेट आशिष विजय पनवेलकर यांनी आयोजित केला होता.
       यावेळी ऋषिकेश पेणकर यांचा पंजाब येथे पार पडलेल्या शरिर सौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला असून भारत श्री या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्याबाबत बाळासाहेबांच्या शिवसेनेने जाहिररित्या सत्कार करण्यात आला. डॉ. जान्हवी संतोष वाजेकर पनवेल व उरण तालुक्यामध्ये बीडीएस ही पदवी मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. ऍडव्होकेट ओंकार विजय पनवेलकर कायदेविषयविधी महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला. तसेच कराटे क्षेत्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली निधी अरविंद पनवेलकर, संगीत क्षेत्रात झालेली निधी अरविंद पनवेलकर, संगीत क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या शौर्य रवींद्र उतेकर, शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या शुभ्रा कपिल कळवेकर, १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या आर्यन राजकुमार मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एनसीसीमध्ये बी सर्टीफिकेटस घेवून उत्तीर्ण होणाऱ्या हर्षद मंगेश साळवी, नर्सिंग क्षेत्रात प्राविण्य संपादन केलेल्या भक्ती मंगेश सल्वी, क्रिडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या कु. लोमेश नरेंद्र पनवेलकर व नुपूर दैवत पनवेलकर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, पनवेल महानगरप्रमुख ऍडव्होकेट प्रथमेश सोमण, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान, उपशहरप्रमुख अर्जुन परदेशी, तसेच शाखाप्रमुख किरण कळवेकर,किरण पवार, प्रणित मालगुडकर, उपशाखा प्रमुख प्रतिक वाजेकर, कुंभार समाज अध्यक्ष अमित वाजेकर, कुंभार समाज तालुकाध्यक्ष रितेश पनवेलकर, कुंभार समाज पंच कमिटी दत्तात्रेय पनवेलकर यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आणि कुंभार समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *