पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात एमटीपी आणि पी.सी.पी.एन.डी.टी., चाईल्ड डेथ रिव्हू समितीची बैठक संपन्न.
पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात एमटीपी आणि पी.सी.पी.एन.डी.टी., चाईल्ड डेथ रिव्हू समितीची बैठक संपन्न
पनवेल दि. २५ (वार्ताहर): एमटीपी (मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेंग्नसी ऍक्ट) आणि पी.सी.पी.एन.डी.टी.(गर्भलिंग प्रतिबंध कायदा) समितीची बैठक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली तर चाईल्ड डेथ रिव्हू समितीची बैठक महापालीकेच्या मुख्यालयात माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
एमटीपी आणि पी.सी.पी.एन.डी.टी. बैठकीवेळी समिती सदस्य डॉ. गिरीश गुणे, माता बालसंगोपन अधिकारी डॉ.रेहाना मुजावर, परिचारिका संगीता पाटील, प्रियांका पाटील, प्रफुल्ल घरत, सामाजिक कार्यकर्त्या जयश्री बर्फे, सुनिता शिंदे उपस्थित होते. तसेच चाईल्ड डेथ रिव्हू समितीच्या बैठकिस डॉ.जय भांडारकर, डॉ. संजय गुडे, डॉ. संतोष जायभाये, डॉ. पल्लवी चव्हाण उपस्थित होते. बेकायदेशीरित्या गर्भपात करणाऱ्या रूग्णालयांवर महापालिकेच्यावतीने कडक कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील सतर्क राहून पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात बेकायदेशीररित्या गर्भलिंग चाचणी हेात असेल त्याची माहिती महापालिकेस कळविण्याचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच पी.सी.पी.एन.डी.टी.(गर्भलिंग प्रतिबंध कायदा) समितीची बैठक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच घेण्यात आली.यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रूग्णालये तसेच सोनोग्राफी सेंटर्समधील शासकिय नियमांचे कठोर अमंलबजावणी करणेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच महापालिकेच्यावतीने गर्भ लिंग चाचणी विषयक पोस्टर छापले असून ते संबधित सर्व रूग्णालयात देण्यात आले आहेत. एखाद्या सोनोग्राफी सेंटरची मुदत संपत आल्यास एक महिना आधीच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून, त्या सोनोग्राफी सेंटरने पुढील मान्यतेसाठी महापालिकेकडे अर्ज करून मंजूरी घ्यावी, अन्यथा अशा मुदत संपूनही सुरूअसलेल्या सोनोग्राफी सेंटरवरती कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी सूचित केले आहे. महापालिका क्षेत्रातील कोणत्याही रूग्णालयात 0-5 वयोगटातील बाल मृत्यू झाल्यास चोवीस तासाच्या आत महापालिकेस कळविणे बंधनकारक आहे. या विषयावरती चाईल्ड डेथ रिव्हू बैठकीत चर्चा करण्यात आली. तसे पत्र संबधित रूग्णालयांना देण्यात येणार असल्याचे समिती सदस्यांनी