परमपूज्य ॐ दत्त श्री ठाकूर महाराज समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
परमपूज्य ॐ दत्त श्री ठाकूर महाराज समाज भूषण पुरस्काराने सन्मानित.
उरण दि. 23 ( विठ्ठल ममताबादे )सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाज उरण या संस्थेच्या वतीने रविवार दि 22 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पारितोषिक वितरण व सत्कार समारंभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. अध्यात्मिक क्षेत्रातील प्रसिद्ध संत परमपूज्य ॐ दत्त श्री ठाकूर महाराज (श्री क्षेत्र गाणगापूर निवासी) यांना हा पुरस्कार जाहीर झाला. 22 जानेवारी 2023 रोजी रामकृष्ण आत्माराम पाटील समाज मंदिर हॉल येथे आयोजित कार्यक्रमात श्री ठाकूर महारांजाचे सुपुत्र निनाद ठाकूर व त्यांच्या पत्नी उज्वला निनाद ठाकूर यांनी हा पुरस्कार स्विकारला.
पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ प्रसंगी सोमवंशीय क्षत्रीय पाठारे ज्ञाती समाज उरणचे अध्यक्ष अरुण पाठारे, उपाध्यक्षा पल्लवी म्हात्रे,सचिव – रमेश नाईक, खजिनदार – हेमंत अधिकारी, सहसचिव -मनोज म्हात्रे, सहखजिनदार दत्ता पुरो, सहकार्यवाह -पराग म्हात्रे, सचिन पाठारे, राजू माळी आदी पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते. प्रपंचातून परमार्थ कसा करायचा हा संदेश ॐ दत्त ठाकूर महाराजांनी आपल्या भक्तांना दिला.निस्वार्थी हेतूने आपले संपूर्ण जीवन जनतेसाठी, समाजासाठी अर्पण करणा-या,भाविक भक्तांना भक्तीचा मार्ग दाखविणारे, गोर गरिबांना मदत करणारे परमपूज्य ॐ दत्त श्री ठाकूर महाराज (श्री क्षेत्र गाणगापूर निवासी) यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याने सर्वच भाविक भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परमपूज्य श्री ॐ दत्त ठाकूर महाराजांचे कार्य आता त्यांचे सुपुत्र निनाद ठाकूर हे उत्तमपणे पुढे नेत आहेत. त्यांचे कार्य व विचार सर्वासाठी प्रेरणादायी व आदर्श आहेत. असे गौरवोदगार या प्रसंगी अरुण पाठारे यांनी काढले.या कार्यक्रम प्रसंगी समाजाला मदत म्हणून एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ॐ दत्त परिवारा तर्फे देण्याचे जाहिर करण्यात आले.