पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे 4 पैकी 3 योध्ये कोरोनावर मात करून परतले घरी

पनवेल दि.27 (वार्ताहर)- पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे 4 योध्ये हे नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने नवी मुंबई येथील डि.वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यातील 3 योध्ये कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले आहेत. तर एक योध्दा येत्या एक-दोन दिवसात घरी परतेल.

पनवेल तालुका पोलिस ठाण्यातील 4 कर्मचाऱ्यांना साधारण महिनाभरापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाल्याने व त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना नवी मुंबई येथील डि.वाय. पाटील रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी पूर्ण उपचार घेऊन ते आता घरी परतण्यास सुरवात झाली आहे. त्यातील तीन योध्ये घरी परतले आहे. तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ रणदिवे हा सुद्धा कोरोनावर मात करून कामोठे येथील से.-8 येथे महावीर वास्तू या आपल्या निवासस्थानी परतला असता पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी वर्गाने त्याच्या घराच्या प्रांगणात जाऊन उपचार घेऊन सुखरूप परतल्याबद्दल त्याच्यावर पुष्पवृष्टी करून त्याचे स्वागत केले व लवकरच पुन्हा कर्तव्य बजाविण्यासाठी आमच्यात सामिल हो असे आवाहनही केले.

फोटोः तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचारी सोमनाथ रणदिवे यांचे घरी परतल्याबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *