पनवेल वार्ता न्यूज!हिंदुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थे तर्फे पदवीदान समारंभ संपन्न.

हिंदुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थे तर्फे पदवीदान समारंभ संपन्न
पनवेल दि.२२(संजय कदम): हिंदुदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थे तर्फे (KGP) तळोजाच्या महाविदयालयात वार्षिक सम्मेलन नुकतेच संपन्न झाले.
             या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये पहिल्या दिवशी सी. बी. एस. ई. च्या 500 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतला होता. दुसऱ्या दिवशी स्टेट बोर्ड व कॉलेजच्या 900 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. तसेच दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे विधी विद्यालयातर्फे पदवीदान समारंभ करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे नवी मुंबई परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील, तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सोनावणे, लॉ कॉलेजचे प्रिन्सीपल डॉ. राजेश साखरे यांच्या उपस्थितीत पदवीदान प्रदान करण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी मराठी माध्यमाच्या 400 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. त्याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करून ओम साई प्रस्तुत राजा आदईकर यांच्या साहेबांच्या जीवनावर पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी आमदार व जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, उद्योजक जे. एम. म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, कॉंग्रेस नेते आर. सी. घरत, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस महेंद्र घरत, राष्ट्रवादी अध्यक्ष पनवेल सतीश पाटील, काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, माजी सभापती काशीनाथ पाटील, शिवसेना पनवेल महानगर पालिका संघटक  डी एन मिश्रा, शेकाप नेते नारायणशेठ घरत, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस अफरोज शेख, माजी नगरसेवक हरेश केणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, महानगरप्रमुख शिवसेना पनवेल एकनाथ म्हात्रे, शिवसेना महानगरपालिका उपसंघटक बाळाराम मुंबईकर, महानगर संघटक दिपक घरत ह्या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष व संख्येचे चेअरमन बबनदादा पाटील, सी.बी.एस.ई प्रिन्सिपल इलावली मॅडम, स्टेट बोर्ड प्रिन्सिपल राणे मॅडम, गोंधळी सर व हमीदा मॅडम, एस : वी कॉलेज प्रिन्सिपल डॉ. कांबळे सर, डी व बी फार्मा च्या प्रिन्सिपल मिताली पाटिल व अर्चना अवसरे, लॉ कॉलेज प्रिन्सिपल डॉ. साखरे, कमलु पाटील, विद्यालयाचे प्रिन्सिपल बोराडे सर व पाटोळे सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे गणेश पाटिल, कैलास पाटिल, दिनेश पाटिल, नितीन पाटील, जयंत बागडे व काळेकर सर यांनी केले.
फोटो : कमळगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थे तर्फे पदवीदान समारंभ संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *