पनवेल वार्ता न्यूज!! अलिबाग येथे सोलर रूफटॉप योजनेबाबत जनजागृती परिसंवाद.
अलिबाग येथे सोलर रूफटॉप योजनेबाबत जनजागृती परिसंवाद
अलिबाग, दि. २१ जानेवरी २०२३:
केंद्र शासनाने सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविली आहे . घरगुती ग्राहकांच्या वीज बिलात बचत करण्यासाठी, केंद्र सरकारने आणलेल्या सोलार रूफ टॉप योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी व पर्यावरण संरक्षणात आपले हातभार लावण्यासाठी, महावितरणने सोलर रूफ टॉप योजना जाहीर केली. सदर योजनेची जनजागृती करण्यासाठी भांडुप परिमंडळातील विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले आहेत. भांडुप परिमंडलातील मुख्य अभियंता श्री. सुनील काकडे यांच्या आदेशानुसार व अधीक्षक अभियंता श्री. इब्राहीम मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथील ओझोन रेसिडेन्सी कॉप. हाऊ. सोसायटीच्या रहिवाशांसाठी सोलर रूफ टॉप योजना जनजागृती कार्यक्रम दि. २० जानेवरी २०२३ रोजी संपन्न झाले.
या जनजागृती कार्यक्रमात अलिबागचे अति. कार्यकारी अभियंता श्री. अजितकुमार पिंगळे यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर, अधीक्षक अभियंता, पेण मंडळ श्री. इब्राहिम मुलानी यांनी सोलार रुफ टॉप योजनेबाबत माहिती दिली व या योजनेचे फायदे सर्वांना समजावून सांगितले.अलिबागचे सहाय्यक अभियंता श्री. प्रवीण म्हात्रे यांनी सोलर रुफ टॉप योजनेमध्ये घरगुती ग्राहकांना मिळत असलेल्या अनुदानाबाबत माहिती दिली. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी व नेट मिटरिंग बद्दल ही सांगितले.सोसायटीतील ग्राहकांनी योजनेबद्दल प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन केले. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल ५० कुटुंब या कार्यक्रमात सहभागी झाले.
या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अधीक्षक अभियंता, पेण श्री. इब्राहिम मुलांनी सोबत अलिबागचे कार्यकारी अभियंता (प्रभारी) श्री. अजितकुमार पिंगळे, अलिबागचे सहाय्यक अभियंता श्री. विशाल सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता श्री. पंकज जाधव व श्री. प्रवीण म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.