हजारो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने केले लंपास.

हजारो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने केले लंपास
पनवेल, दि.20 (संजय कदम) : बंद घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे हजारो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना पनवेल शहरातील धोबी आळी येथे घडली आहे.
या ठिकाणी राहणारे रितेश पवार यांच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील ग्रीलच्या दरवाजाला लावलेले टाळे तोडून तसेच आतील लाकडी दरवाजास असलेली लोखंडी कडी तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून बेडरुममधील लोखंडी कपाटाचे लॉक उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने ज्याची किंमत जवळपास 92 हजार रुपये इतकी आहे चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *