राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई.

राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई : अवैध मद्याचा साठा व ट्र्क मिळवून ७६,७७,८४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत
पनवेल दि . १८ ( संजय कदम ) : राज्य उत्पादन शुल्क पनवेल विभागाची धडक कारवाई करीत मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल जवळील मौजे कोपरा गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या सायन -पनवेल द्रुतगती मार्ग क्रमांक एक वर एक ट्र्क अडवून त्याच्या द्वारे अवैध मद्याचा साठा ७६,७७,८४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे .
नाताळ व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या दारूची आवक महाराष्ट्रात होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती . त्याच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण ,कोकण विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय पुरळकर , दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे , शिवाजी गायकवाड , सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुभाष जाधव , जवान विलास चव्हाण ,महिला जवान रमा कांबळे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून तेथे असलेल्या पथकर वसुली नाक्याच्या पुढील बाजूस संशयित ट्रक क्रमांक जीजे – ०६ – बीटी – ९७१७ यास अडवून त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित रॉयल ब्लु व्हिस्कीच्या बाटल्या असे एकूण अवैध गोवा मद्याचे ८९८ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत . या प्रकरणी संदीप पंडित ( वय ३८ ) ट्रक चालक व समाधान धर्माधिकारी ( वय ३० ) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. व त्यांच्या वर पुढील कारवाई करण्यात आल्या.

कोट –
अवैध मद्य निर्मिती , विक्री ,वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० २३३ ९९९९ व व्हाट्सअप क्रमांक ८६२२००११३३ तसेच फोन नंबर – ०२२ -२२६३८८१ वर संपर्क साधावा – श्रीमती कीर्ती शेडगे ( अधीक्षक. राज्य उत्पादन शुल्क ,रायगड )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *