सफाई कामगार मध्ये लोकग्रहास्तव लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे कडून आर्सेनिक अल्बम ३० चे वितरण

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या उद्रेकाला प्रतिबंध करण्यासाठी व रहीवाशांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून सफाई कामगारच्या आग्रहास्तवच आर्सेनिक अल्बम ३०चे दारावेगांव वितरण करण्यात येत आहे.

नवी मुंबई मध्ये गरजूंना धान्य वाटप, त्यानंतर रस्त्यावर तसेच सोसायटी आवारात सातत्याने जंतुनाशक फवारणी झाल्यावर परिसराच्या स्वच्छतेसोबत रहीवाशांच्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी प्रभागात आर्सेनिक अल्बम ३० चे वितरणचे घरटी वितरण करण्यास सुरूवात केली. या गोळ्यांच्या वितरणासाठी सफाई कामगारकडून विरेंद्र म्हात्रे यांच्याकडे मागणीचा रेटाही लावला जात होता. सफाई कामगारच्या मागणीस्तव लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवी मुंबई मध्ये घरटी पिंजून काढताना ३०० गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण केले.

नवी मुंबई मध्येही लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांचा गेल्या पाच-सहा वर्षापासून दांडगा जनसंपर्क असल्याने तेथील लोकांनीही आर्सेनिक अल्बम ३० वितरणासाठी विरेंद्र म्हात्रे यांना साकडे घातले. त्या ठिकाणीही विरेंद्र म्हात्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३०० गोळ्यांच्या पाकिटाचे वितरण केले. हा माझा नाही, तो माझा नाही ही राजकीय भावना बाजूला ठेवून कोरोना काळात नवी मुंबईकर जगला पाहिजे. कोरोनाशी लढताना त्याच्यात रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे या एकमेव सामाजिक भावनेतून आपण गोळ्यांच्या पाकिटांचे वितरण करत असल्याची माहिती लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र म्हात्रे यांनी दिली.यावेली गुरुनाथ नाईक, सोमनाथ म्हात्रे, सोमनाथ बारवे, कल्पेश गेहलोतव ईतर ग्रुपचे सदस्य उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *