शिवजयंती शोभायात्रेतील शिव प्रेमींसाठी सरबताचे वाटप.

शिवजयंती शोभायात्रेतील शिव प्रेमींसाठी सरबताचे वाटप
पनवेल दि.२१(संजय कदम): कामोठे वसाहतीमध्ये काढण्यात आलेल्या शिव जयंती सोहळ्यानिमित्त शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या शिव भक्तांसाठी मोफत सरबताचे वाटप सचिन मनोहर त्रिमुखे (धर्मा इंटिरियर कंपनी ) आणि बबन खणसे (श्री विघ्नहर्ता वडापाव सेंटर सेक्टर 18) यांच्या तर्फे करण्यात आले होते.
स्वस्तिक कृष्णा बिल्डिंग सेक्टर – 11 प्लॉट न 08,या सोसायटी जवळ कृष्णा हॉटेल समोर शिवजयंती सोहळा २०२३ निमित्त शोभेयात्रेत सर्व शिवभक्ताना सरबत वाटप करण्यात आले.शोभेयात्रांच्या सगळ्या शिवभक्तांनी सरबतचा आनंद घेत खूप जलोषात कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रभाकर दादा गोवारी, संदीप सुतार, बबन गोगावले, चंद्रशेखर बनसोडे , धनंजय येवले , सुरेश मोरे, अमित भोसले, सखाराम घुजल ,शिवकांत यादव ,ललित चंदा ,आदित्य गोगावले , अक्षय पवार आपण सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सुंदर नियोजनाबद्दल शिवप्रेमींनी त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *