पाण्यासाठी झाला सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पनवेल, दि. 26 (वार्ताहर) : भरधाव टँकरच्या चाकाखाली आल्याने एका मोटार सायकल चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.

तळोजा सेक्टर 34 येथील बी.जी.शिर्के कंन्स्ट्रक्शनच्या साईटवर सुरक्षा रक्षकाचे काम करणारा राजकुमार यदुवीर सिंग हा कार्यालयातील मोटार सायकल घेवून पाणी आणण्यासाठी निघाला असताना तो कंपनीच्या बाहेर पडल्यानंतर एका पाण्याच्या टँकरने त्याच्या मोटार सायकलीला जोरदार धडक दिल्याने त्यात तो खाली पडून त्याच्या अंगावरुन टँकर गेल्याने त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर टँकर चालक फरार झाला आहे. या अपघाताची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *