शिवसहाय्य पनवेलतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन
पनवेल, दि. 26 (वार्ताहर) : सध्या कोरोना काळात महाराष्ट्राला किंबहूना देशाला रक्ताची चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत शिवसहाय्य पनवेलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि.31 मे 2020 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत कृष्णभारती हॉल पनवेल येथे करण्यात आले असून सदर रक्त संकलन रोटरी क्लब ऑफ नवीन पनवेल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून होणार आहे.
तरी रक्तदात्यांनी रक्तदान करावे. यावेळी न विसरता मास्क व रुमाल लावून यावे. रक्तदात्यास आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या रोगप्रतिकार शक्तीवर्धक औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. रक्तदात्याचे नाव व त्यास रक्तदानास उपस्थित राहण्याची सोयीची वेळ यासाठी संकेत शिरिष बुटाला भ्रमणध्वनी 9930418899, राकेश अनिल टेमघरे 8108416579, पराग शरद मोहिते 9702171112 आणि अॅड.अमर दिलीप पटवर्धन 9029527627 यांच्याशी संपर्क साधावा.