सामाजिक कार्यकर्ते राहूल गोगटे व संजय लोंढे यांनी केले मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे तालुक्यात वाटप

पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः सामाजिक कार्यकर्ते राहूल गोगटे व संजय लोंढे यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पनवेल परिसरातील अनेक शासकीय कार्यालयात तसेच गरजवंतांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे तसेच सॅनिटायझर, मास्क आणि महत्वाचे म्हणजे ये-जा करण्यासाठी पास काढून देण्याचे काम विना मोबदला केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते राहूल गोगटे व संजय लोंढे यांनी पनवेल तहसील कार्यालयात सर्वसामान्य लोकांना वाटण्यासाठी तांदूळ, साखर, तुरडाळ, आटा, डेटॉल सोप आदींचे वाटप केले आहे. त्याचप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सॅनिटायझर, मास्क, फेस मास्कचे वाटप केले आहे. पनवेल महानगरपालिकेतील स्वच्छता दुतांना तसेच पाणी सोडणार्‍या कर्मचार्‍यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले आहे आणि महत्वाचे म्हणजे विभागातील नागरिक इतर जिल्ह्यात अडकले होते त्यांना रायगड कलेक्टर व नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्याशी संपर्क साधून मोफत पास काढून देण्याचे काम केले आहे. या त्यांच्या कार्याची दखल शासकीय यंत्रणेने घेवून त्यांचे कौतुक केले आहे. आजही गरजवंतांना त्यांच्या परीने ते मदत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *