खोपोलीतील अबोली महिला रिक्षा चालकांना अन्नधान्य वाटप – संदीप पोखरकर यांचा पुन्हा मदतीचा हात

पनवेल/प्रतिनिधी,

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉक डाऊन आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सर्वत्र सुरु आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढत चिंताजनक असल्याने पुन्हा लॉक डाऊन वाढवण्यात येईल अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे. लॉक डाऊनमुळे महिला रिक्षाचालकांचा व्यवसाय पूर्ण बंद आहे. गेले दोन महिने व्यवसाय बंद असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे ओळखून अबोली महिला रिक्षाचालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत त्यांना अन्नधान्य मिळवून देण्यास प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत असून अनेक दानशूर व्यक्तींनी अबोली महिला रिक्षा चालकांना अन्नधान्य देण्यात पुढाकार घेतला आहे.

नुकतेच खोपोली व कल्याण अबोली महिला रिक्षा चालकांना संदीप पोखरकर यांच्या मार्फत अन्नधान्य वाटप करण्यात आले. या मदतीबाबत सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत व अबोली महिला रिक्षाचालक मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *