लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई (नियो.) यांच्या वतीने पत्रकार संजय कदम यांना करण्यात आले विशेष सन्मानित
पनवेल, दि. 23 (वार्ताहर) : नवी मुंबई येथील लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई (नियो.) यांच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम यांना कोरोनासारख्या जागतिक महासंकटात सामान्य जनतेची सेवा केल्याबद्दल सन्मानचिन्ह देवून आज सोमवार दि. 25/05/2020 रोजी गौरविण्यात आले.

लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई (नियो.) चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र ‘गुरु’ यशवंत म्हात्रे यांनी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम आत्तापर्यंत आपल्यातील मानवी चेतना जागृत ठेवून कोरोनासारख्या जागतिक महासंकटात सामान्य जनतेची सेवा केल्याबद्दल व त्यांनी हे केलेले कर्तव्य थोर अथक परिश्रम घेवून केले असल्याने त्याविषयी कृतघ्नता व प्रेम व्यक्त करण्यासाठी संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे.