डॉ.प्रज्ञा भोईर यांना प्रचार सर्टीफिकेट ऑफ कॉमिनेंन्ट करण्यात आले सन्मानित
पनवेल, दि. 23 (वार्ताहर): डॉ.प्रज्ञा भोईर यांनी आत्तापर्यंत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात समाजात केलेल्या कार्याची दखल घेत प्रचार सर्टिफिकेट ऑफ कॉमिनेंन्ट यांच्यातर्फे विशेष प्रशस्तीपत्रक देवून डॉ.हेमंत मकावाना (सीएमडी) यांनी कौतुक केले आहे.
डॉ. प्रज्ञा भोईर यांनी गेल्या दोन महिन्यापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात समाजामध्ये औषधे वाटप तसेच इतरांना मदतीचा हात त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात त्यांनी केलेल्या आत्तापर्यंत कार्याची दखल घेत प्रचार सर्टीफिकेट ऑफ कॉमिनेंन्ट यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अॅएण्ड गर्व्हरमेंन्ट ऑफ इंडिया यांच्या वतीने मास्क वाटप सोशल डिस्टन्सिंगचा वापर तसेच सॅनिटायझर प्रचार आदी कार्याबद्दल त्यांना विशेष प्रशस्तीपत्रक देवून त्यांना सन्मानित केले आहे.