जनता दल (सेक्युलर) आणि रिपरिवर्तन फाउंडेशन च्या सहकार्याने भांडुप सोनापूर येथे वेश्या वस्तीत शिधा, सॅनिटायझर आणि मास्क वाटप

पनवेल दि.24 (वार्ताहर): आज भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान मांडले आहे. देशात ओरॉनचा प्रसार हा झपाट्याने होत आहे, त्यावर उपाययोजना म्हणून सरकारमार्फत गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून लोकडाऊन पुकारण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, वैद्यकीय सेवा आणि शासकीय यंत्रणा वगळता सर्वच उद्योग धंदे हे बंद आहेत. कित्येक गरीब मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. केंद्र करकर, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत बहुतांश लोकांपर्यंत मदत कार्य पोचवण्याचे उत्तम कार्य चालू आहे.

परंतु समाजातील असे काही घटक आहेत कि त्यांचा विचार करणारे फार कमी लोक आहेत. अशाच प्रकारे आहे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया! शेवटी त्या देखील माणूसच आहे. लोकडाऊनमुळे त्यांच्यावर देखील उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता. कोरोना विषाणू प्रादुर्भावाची भीतीने त्यांचा व्यवसाय आता ठप्प झाला आहे. भांडुप सोनापूर येथे देखील अशाच प्रकारची वस्ती आहे. काही महिला या स्थानिक आहेत व काही महिला या इतर राज्यांमधून स्थलांतर करून आलेल्या आहेत. जनता दल (सेक्युलर) चे ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांच्या माध्यमातून आणि रिपरिवर्तन फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे यांनी पुढाकार घेत भांडुप सोनापूर येथील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिधावाटप तसेच मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करून सामाजिक जबाबदारी जपली. प्रसंगी जनता दल भांडुपचे प्रवीणजी, जमील शेख आणि रिपरिवर्तन फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे, विशाल खवळे, दीपक पाटील, अनिकेत सकपाळ, प्रसाद पेडणेकर, आबिद हाश्मी उपस्थित होते. माणसाने माणसाशी नेहमी माणसाप्रमाणेच वागावे,जात, धर्म, लिंग, व्यवसाय व इतर कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नये.समाजातील कोणताही घटक हा जीवनावश्यक बाबीपासून उपेक्षित अथवा वंचित राहता काम नये, सर्वांपर्यंत मदत केली जावी व शासनानेदेखील या घटकांपर्यंत मदत पोहोचवावी अशा प्रकारची विंनती जनता दल (सेक्युलर) चे ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीवकुमार सदानंदन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *