रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे प्रेसिडेंट रोटरिअन हार्मेश तन्ना ह्यांच्या माध्यमातून संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या कलाकारांना धान्य वाटप
पनवेल दि.24 (वार्ताहर): रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउनचे प्रेसिडेंट रोटरिअन हार्मेश तन्ना ह्यांच्या माध्यमातून संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या २६ कलाकारांना धान्य वाटप करण्यात आले आहे.
देशात कोरोना विषाणूने ने घुमाकूळ घातला असून, त्याचा आर्थिक फटका कलाकारांना बसला आहे. हातावर पोट असणान्या लावणी, लोकधारा, निवेदक, ऑर्केस्ट्रा, बॅकस्टेज कलाकार या सर्वांचा मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने खूप मोठा हंगामी सीजन असल्यामुळे या तीनही महिन्यात कार्यक्रम करुन ते कलाकार पुढील वर्षभराची आर्थिक तरतूद करत असतात. परंतु कोरोनामुळे लॉक डाऊन असल्यामुळे रायगड जिल्ह्यातील कलाकारांवर दैनदीन जीवनात उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभुमीवर रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन, प्रेसिडेंट रोटरिअन हार्मेश तन्ना ह्यांच्या माध्यमातून संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थच्या कलाकारांना धान्य वाटप करण्यात आले, सदर धान्य वाटण्यापासून ते मिळ्वण्यापर्यंत, निर्माता निवेदक प्रवीण मोहोकर ह्यांचे मोलाचा सहभाग लाभला. रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडर्स्टियल टाऊनच्या वतीने करण्यात आलेल्या या मदती बद्दल कलाराकंनी त्यांचे आभार मानले आहेत.