लॉकडाऊनच्या काळातही शेकडो तरूणांचा युवासेनेत प्रवेश

पनवेल दि.24 (वार्ताहर): सध्याच्या लॉकडाऊनच्या काळातही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली व युवासेनाप्रमुख, महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ह्यांच्या कार्यप्रणालीवर असलेल्या विश्वासाने, युवासेना सचिव वरुण सरदेसाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील ह्यांच्या हस्ते आज तालुक्यातील शेकडो तरूणांनी भगवा ध्वज हाती घेत युवासेनेत जाहिर प्रवेश केला.

तालुक्यातील रोडपाली येथील जय कुष्टे, मिलिंद भोईर, निकेश ठाकूर या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो तरुणांनी आज युवासेनेत सोशल डिस्टंसिंगच पालन करत जाहिर पक्षप्रवेश केला. ह्यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबनदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या कार्यक्रमास शिवसेना उपमहानगरप्रमुख कैलास पाटील, युवासेना जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपविधानसभा अधिकारी सुशांत सावंत, अरविंद कडव, विजय शशिकांत कुष्टे, ॲड. धर्मनाद गोंधळी, हरिश्चंद्र ठाकूर, कळंबोली शहर संघटक विवेक गडकरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *