जीवन जगण्यासाठी केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने लसीची निर्मिती करून ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावी- रामेश्वर महाराज नरे

पनवेल दि.24 (वार्ताहर): जगभरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावेळी केंद्र तसेच महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगण्यासाठी लसीची निर्मिती करून ती सर्वांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे अध्यक्ष, रायगड जिल्हा भूषण व आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासन सन्मानित रामेश्वर महाराज नरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. त्यातच लॉकडाऊन आहे. त्यामुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या चौथा लॉकडाऊन सुरू आहे. शासनाकडून निधी देण्याचे काम चालू आहे. लोकांना निधीपेक्षा सध्या जीवन जगण्यासाठी लसीची निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने लक्ष घालून लसीची निर्मिती करून ती सर्वांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी रामेश्वर महाराज आदिवासी संस्थेचे अध्यक्ष, रायगड जिल्हा भूषण व आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासन सन्मानित रामेश्वर महाराज नरे यांनी निदेनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *