भांडूप परिमंडलातील वाशी मंडळाच्या विद्युत ग्राहकांशी महावितरणने केला वेबिनार मार्फत संवाद
भांडूप, दि. 24/5/2020:
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे वीज वितरण संबंधी समस्या व सूचना महावितरणकडून संपूर्ण राज्यात परिमंडलनिहाय वीज ग्राहकांशी वेबिनार द्वारे संवाद साधून, दैनंदिन तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा. डॉ.नितीन राऊत यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानुसार, वेबिनार आयोजित करण्याबाबत भांडूप परिमंडलच्या, मुख्य अभियंता, सौ.पुष्पा चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी मंडळाच्या अधीक्षक अभियंता श्री.राजाराम माने यांनी वाशी मंडळामार्फत विविध वीज ग्राहक, पत्रकार, विद्युत संगठना यांच्या सोबत विजेच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी दि.21/5/2020 व दि.22/5/2020 रोजी वेबिनारमार्फत संवाद साधला.
सदरच्या वेबिनारमध्ये लॉकडाऊन च्या काळात महावितरणकडून वीज बिलात येणाऱ्या सुविधा, 1 एप्रिल पासून लागू झालेले वीजदर व के.व्ही.ए.एच (KVAH) बिलिंग संधर्भातील माहिती, वीज पुरवठ्याबाबत तक्रारी, महावितरणकडून यंत्रणा सक्षमीकरण राबविण्याबाबत येणाऱ्या यंत्रणा इत्यादी बाबत माहिती देण्यात आली.
सदरच्या वेबिनारला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण 95 विद्युत ग्राहक, व ईतर महवितरणचे अधिकारी सहभागी झाले होते. महावितरणच्या हा वेबिनार यशस्वीपणे पार पाडण्यात कार्यकारी अभियंते सर्वश्री. माणिक राठोड व शामकांत बोरसे, उपकार्यकारी अभियंता श्री.प्रणय चक्रवर्ती व उपकार्यकारी अभियंता सौ. भागवत यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्राहकांच्या अडचणी ऐकून घेऊन सोडविल्यामुळे वीज ग्राहक संगठनांनी महावितरणचे व मा. ऊर्जा मंत्री यांचे आभार मानले.
ममता पाण्डेय,
जनसंपर्क अधिकारी,
महावितरण.