लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेची विस्तारित कार्यकारिणी जाहीर

पनवेल, दि. 23 (वार्ताहर) : लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.संजय सोनावणे यांनी संस्थेची विविध विभागाची विस्तारित कार्यकारिणी जाहीर केली आहे.

त्यामध्ये डॉ.शंकर नांगरे विभागीय उपाध्यक्ष पुणे विभाग, अरूण सुर्यवंशी सचिव पुणे जिल्हा, संतोष सोनावणे अध्यक्ष शालेय मदत विभाग रायगड, मयुर सोनावणे युवा जिल्हाध्यक्ष रायगड, प्रथमेश सोनावणे युवा जिल्हाध्यक्ष नवी मुंबई, रूपम सोनावणे युवा सचिव नवी मुंबई, नितीन जोशी राज्य उपाध्यक्ष सामाजिक विभाग, प्रमोद जाधव उपाध्यक्ष प्रिंट मिडीया आदींची नियुक्ती 31/12/2022 पर्यंत करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *