राष्ट्रीयकृत बँकेचे कामकाज नागरिकांच्या हिताचे व्हावेे यासाठी पनवेल तहसीलदार अमित सानप यांचे लिड बँकेला पत्र

पनवेल, दि.23 (वार्ताहर) : राष्ट्रीयकृत बँकेच्या अकार्यक्षमतेविरोधात सामाजिक कार्यकर्ते सुनील पोेतदार यांनी पनवेल तहसीलदार अमित सानप यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर सानप यांनी बँकांना नागरिकांच्या सेवेसाठी उचित पाऊल उचलावेत व नागरिकांना सुरळीत सेवा द्यावी असे पत्र रायगड जिल्ह्याची लिड बँक असलेल्या बँक ऑफ इंडिया पनवेल शाखाधिकार्यांना पाठविल्यामुळे बँकांचे कामकाज यापुढे नागरिकांच्या सेवेेचेे होेते की नाही? याकडेे सार्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातेदारांना चेक बुक आणि एटीएम कार्ड दिली गेली नसल्यामुळे अनेक बँकांचे खातेदार आपले आर्थिक व्यवहार करण्यास असमर्थ ठरत आहेेत, अशा प्रकारची तक्रार पनवेल येेथील सामाजिक कार्यकर्ते सुनील पोेतदार यांनी तहसीलदार पनवेल यांच्याकडे केल्यावर तहसीलदार पनवेल यांनी तात्काळ राष्ट्रीयकृत बँकांची आणि रायगड जिल्ह्याची लिड बँक म्हणूून ओळखल्या जाणार्या बँक ऑफ इंडिया पनवेल शाखेेचे अधिकारी यांना 19/05/2020 रोजी पत्र पाठवून नागरिकांसाठी सोयीसाठी व केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आर्थिक व्यवहार हे कॅशलेस व्हावेत असा आदेश भारताचेे पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी दिलेला असल्यामुळे एटीएम कार्ड अथवा चेेक बुक नसल्यामुळे आणि रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य जनतेला मोबाईल बँकींग येत नसल्यामुळे कॅशलेस व्यवहार कसे होणार? हा प्रश्‍न धजावत होता. म्हणूून सामाजिक कार्यर्कर्ते सुनील पोतदार यांनी पनवेल तहसीलदार आणि पनवेेल प्र्रांताधिकारी दत्तात्रेय नवले यांंच्याकडे तक्रार केल्यावर दत्तात्रेेय नवले यांनी पनवेल तहसीलदार अमित सानप यांना आदेश देेवून रायगड जिल्ह्याची लिड बँक म्हणूून ओळखल्या जाणार्या बँक ऑफ इंडियाला पत्र दिलेले आहे की आपला कारभार जनतेच्या हितासाठी व पंतप्रधानांच्या आदेशाचा सन्मान म्हणून तात्काळ एटीएम कार्ड व चेक बुक देण्याची व्यवस्था करण्याबाबत आपण राष्ट्रीयकृत बॅँकांना कळवावे, असा आदेश दिल्यामुळे लवकरच पनवेलमधील नागरिकांना कॅशलेेस व्यवहार करण्यासाठी चेेक बुक व एटीएम कार्ड दिलेे जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहेे. तसे न झाल्यास याबाबत सुनील पोेतदार यांंच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण पंंतप्रधान तसेेच केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *