नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट; कोरोनामुळे आणखी एक बळी..

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : नेरुळ मधील श्री गणेश सोसायटीतील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट मधील एक तरुण उद्योजक श्री. रोशन बारवे या युवकाचे काल रात्री कोरोना मुळे निधन झाले, सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असलेल्या या युवकाच्या निधनाने नवी मुंबई शहरात शोककळा पसरली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील एकूण पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती आतापर्यंत एकाच कुटुंबातील तिघांनी आपला जीव गमावला असून वयोवृद्ध आजोबा आणि आजीचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली आहे एका मुलाने कोरोनावर मात दिली तर वडील मयत मुलाचा वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली असून ते हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *