अबोली महिला रिक्षा चालक संघटना कल्याण मधील महिलांना संदीप पोखरकर यांची मदत
पनवेल/प्रतिनिधि,
लॉकडाउन च्या काळात रोजगार बंद असल्याने आनेकांवर उपासमारिची वेळ आली आहे. या काळात अबोली महिला रिक्षा चालकांवरही व्यवसाया अभावी उपाशी राहण्याची वेळ आली आहे. याच बरोबर कल्याण मध्ये कोरोना वायरस चा प्रभाव वाढला असता तेथील महिला रिक्षा चालकांना अन्नधान्याची आवश्यकता असून, अबोली महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष: संतोष तू.भगत यांचे मित्र सामाजिक कार्यकरते संदीप पोखरकर यांनी स्वतःहून संपर्क साधून कल्याण मधील महिलांची विचारपूस करून, आज रिक्षा चालक महिलांना अन्न धान्य देण्यात आले. त्यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत व सचिव विलास मोरे उपस्थित होते. यावेळी महिला रिक्षा चालकांनी व अबोली महिला रिक्षा संघटनेने संदीप पोखरकर यांचे आभार मानले. याच बरोबर बरेच व्यक्तीं स्वतःहून संपर्क साधून अबोली रिक्षा चालक संघटनेतील महिलांना सहकार्य करत आहेत.