पनवेल शहर पोलिसांनी परप्रांतीयांची फसवणूक करणार्‍या टोळीविरोधात केली कारवाई

पनवेल, दि.22 (वार्ताहर) : विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून राज्य शासनाने विविध आदेश जारी केले आहेत. परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी शासनातर्फे रेल्वेची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही अशा लोकांची फसवणूक करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश पनवेल शहर पोलिसांनी केला आहे.

बिहार राज्यात जाणार्‍या विशेष रेल्वेमध्ये बेकायदेशीर प्रवासी शिट मिळवून देण्याकरिता 23 परप्रांतीय नागरिकांकडून पैसे स्वीकारत असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल कोरडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार, पो.उप.नि.किशोरकुमार नेवसे, पो.ना.महेश पाटील, पो.शि.परमेश्‍वर नागरगोजे आदींच्या विशेष पथकाने पनवेल परिसरात छापा टाकून आरोपी हसन याकूब सय्यद (45 रा.वडघर), राघवेंद्र रामेश्‍वर गुप्ता (33 रा.नवनाथ झोपडपट्टी) व इरफान इब्राहीम माहिगीर (42 रा.मालधक्का) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून भारतीय चलनी नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध भादवी कलम 420, 336, 269, 270, 188 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), 135 सह साथरोग प्रति अधि.1897 चे कलम 2, 3, 4 सह महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 चे कलम 11 सह आपत्ती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब) प्रमाणे कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

कोट
प्रवासी मजूरांनी आपल्या नावाची नोंदणी ते राहत असलेल्या भागातील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोलीस ठाणे येथे अथवा कोव्हीड19.महापोलिस.इन (www.covid19.mhpolice.in) या लिंकवर ऑनलाईन करावी. प्रवासी मजूरांना ते राहत असलेल्या भागातून पोलीस, महसूल कर्मचारी बसने रेल्वे स्टेशन येथे घेवून येतात. रेल्वे स्टेशन पर्यंत बस प्रवास, रेल्वे प्रवास थर्मल स्कॅनिंग, जेवण व पाण्याची सोय शासनातर्फे मोफत केली जात आहे. प्रवासी मजूरांनी नोंदणीसाठी कोणत्याही खाजगी इसमांकडे जावू नये तसेच स्वतः अथवा इतर इसमांच्या मार्फत पनवेल रेल्वे स्थानक येथे प्रवासाकरिता येवू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *